Dr.Vilas Deshmukh

Dr.Vilas Deshmukh

Thursday, April 21, 2016

मिलिअन डॉलर किमतीचे भारतीय रस्ते

मिलिअन डॉलर  किमतीचे भारतीय  रस्ते


अमेरीकेचे पूर्व राष्ट्राध्यक्ष ज.फ.केनडी म्हणाले  “अमेरिका श्रीमंत आहे महणून तिथले रस्ते चांगले आहेत आसे नाही तर तिथले रस्ते चांगले आहेत म्हणून अमेरिका श्रीमंत आहे


ठाणे शहरातील UTWT (इ-मार्ग)रस्ते दहाव्या वर्षात पदार्पण करीत आहेत.ह्या नवीन बांधणीच्या रस्त्य्मुळे ठाणे शहराचा  विकास झपाट्याने होत आहे.
दोन हजार सात मध्ये  डॉ .देशमुखांनी पहिला UTWT रस्ता घंटाळी विभागात केला.
ठाण्या च्या मेयर श्रीमती स्मिता इंदुलकर ,सिटी इंजिनिअर श्री के.डी लाला आणि सिटी कार्पो रेटर श्री विलास सामंत ह्यांचा मोठा वाटा वरील प्रोजेक्ट. यशस्वी करण्यात आहे


प्रत्येक चांगल्या कार्यात विघ्न येणार त्या प्रमाणे सुरवातीला ठाणे महापालिकेने खराब झालेल्या डांबरी रेस्त्यावर कॉंक्रीट चा पातळ थर.(UTWT-Ultra thin white topping) टाकण्याचा आणि  टिकाऊ.स्वस्त आणि सुंदर रस्ता नवीन प्रयोग म्हणून करण्याचा माझा प्रस्त्वाव फेटाळला..शेवटी ठाण्याचे नगरसेवक श्री विलास सामंत उपयोगी पडले आणि त्याचा विभागात UTWT रस्ता प्रयोग म्हणून करण्याची परवानगी मला मिळाली.


मला आठवते आहे पहिला रस्ता रात्री मी ,माझी पत्नी आणि दोन मुले ह्याच्या मदतीने पूर्ण केला.UTWT हा शब्द देखील कोणाला माहित नव्हता प्रयोग यशस्वी झाला.आणि लोक मला ओळखू लागले.आणि दोन हजार सात पासून सुरु झालेला UTWT रस्ते करण्याचा सिलसिला सुरु  झाला आणि तो आज तागायत चालू आहे.प्रयोग यशस्वी झाल्या बरोबर ज्या नगरसेवकांना UTWT रस्ते नको होते तेच UTWT रस्ते त्यांना पाहिजे होते. कामाचा पसारा वाढल्यावर लाला साहेबांनी रस्ते बनवन्याचे  काम खाजगी कंपनीला दिले.M/S SMC कंपनीला दीले . कंपनीचे मुख्य अधीकरी सुहास मेहता आणि इंजिनिअर समीर फणसे ह्यांनी डॉ देशमुख ह्यांच्या मदतीने रस्ते बनवन्याचे  काम पुढे यशस्वीरीत्या चालू ठेवले.आता बर्याच लोकांनी हे तंत्र्याज्ञ  शिकून घेतले आहे.आणि डॉ देशमुखांनी आणलेली UTWT Technology ठाणेकरांना पथ संजविनी ठरली.ठाणे गाव म्हणून समजले जायचे ते आता शहर म्हणून ओळखू लागले.

सुरत महापालिकेतला माझा अनुभव वेगळा नाही मला तिथल्या लोकांनी डांबरी हॉट मिक्स  नाकारले.ह्याचा मल त्रास झाला. कोन्क्रीत बनवण्यासाठी लागणारी खडी मला पाहिजे तसे मिळवण्यासाठी मी आजूबाजूच्या गावाकडे फिरलो पण पाहिजे तसे ग्रेडिंग मिळाले नाही आह्मी जे मिळेल त्या खडी वर काम भागवले.


कॉंक्रीट  रस्ते असणे  प्रगत  देशाचे लक्षण आहे  कॉंक्रीट  रोड देशाची प्रगती मोजण्याचे साधन आहे ज्या देशात कॉंक्रीट  रस्ते जास्त तो देश प्रगतशील मानला जातो कॉंक्रीट रोड जरी टिकाऊ असले तरी भारता सारख्या गरीब देशाला परवडणारे नाहीत  आणि म्हणून आपल्या देशात डांबरी रस्ते बांधायला लागतात डांबरी रस्ते जरी स्वस्त असले तरी ते टिकाऊ नसतात ते रस्ते लवकर फुटतात आणि त्याला मोठे खड्डे पडतात हे खड्डे बुजवणे जिकरीचे काम आहे .


आपणास ठाऊक आहे वाढत्या प्रगतीला चागल्या रस्त्याचे महत्व आणि म्हणून आपल्या देशातील रस्त्यावर संशोधन करणाऱ्या संस्था नि स्वस्त टिकवू रस्ते बनवण्याची मोहीम सुरु केली .शासनाने  देखील नवीन रस्ते बनविण्याकडे भर दिला खाजगी कंपन्या सुद्धा  ह्या कार्यक्रमात सहभागी झाल्या.
ठाण्याचे  रस्ते म्हटले तर डॉ  देशमुख ह्याचे नाव घेतल्या   शिवाय पुढे जाता येत नाही .त्यांनी वाहनास निरुपयोगी असलेले रस्ते पुन्हा वाहनास उपयोगी आण्यासाठी HPC(High performance concrete ) बनविले आणि त्याचा पातळ थर  त्या खराब रस्त्यावर ओतला ते कॉंक्रीट  सहज पसरण्या साठी SCC(Self compacting concrete ) चा वापर केला त्यामुळे रस्त्याची पोत सुधरली आणि आपण टिकाऊ आणि जलद रस्ते बनाऊ शकलो ह्याचा फायदा आसा  झाला कि आम्ही ठाण्यात आणि सुरत मध्ये प्रायोगिक तत्वावर रस्ते बनविले . ह्या दोन प्रकारच्या रस्त्यांना डॉ देशमुखांनी  इ-मार्ग आणि इ-पथ आशी नावे  दिली .


इ-मार्ग म्हंणजे वाहनास निरुपयोगी झालेल्या रस्त्यार कान्क्रीटचा पातळ थर  देणे आणि इ-पथ  म्हणजे पंचवीस टक्के झीद्र असलेला डांबरी थर  व त्या मध्ये टाकलेली सिमेंट स्लरी कि जी डांबराच्या झीद्रामध्ये जाऊन झीद्र बंद करते


डॉ  देशमुखांनी नव्याने संशोधित  केलेल्या तंत्रद्यानामुळे दोन हजार सात साली इ-मार्ग ठाणे महापालिकेत आणि दोन हजार तीन साली इ-पथ सूरत महापालिकेत बनाऊ शकलो आज ठाण्यामध्ये इ-मार्ग  पद्धतीचे  दोनशे किलोमीटर लांबीचे रस्ते बनले आहेत तर सुरत मध्ये शंभर किलोमीतर  लांबीचे रस्ते बनले आहेत.  ह्याचा परिणाम असा झाला ठाणे महापालिका आणि सुरत महापालिका ह्याचा विकास झपाट्याने झाला दोन्ही शहरांचा   Future  smart  city मध्ये  समावेश  झाला आहे .


डॉ   देशमुख यांनी संशोधित  केलेल्या इ-मार्ग आणि इ-पथ ह्या दोन्ही तंत्रद्यानाचे  शिक्कामोर्तब झाले जेव्हा  इंडिअन रोड्स कॉंग्रेस कोडल कमिटी ने दोन्ही टेक्निक ला मान्यता दिली आहे .
कमिटीने IRC-SP -७६- २००८ मध्ये लिहिलेला कोड  २०१५ मध्ये सुधारित  केला आहे
इ-पथ चे कोड मध्ये रुपांतर करण्याचे ठरवले
डॉ देश्मुखकानी बनवलेल्या इ-मार्ग आणि इ -पथ रस्त्याचा मोलाचा वाटा हे दोन्ही कोड बनवण्यात आहे इ -मार्ग म्हणजे 'Ultra Thin White Topping "UTWT आणि इ-पथ म्हणजे " Cement grout bitumen macadam.” CGBM


डॉ देशमुखांनी 2007 साली प्रथम थाने महापलिकेत इ-मार्ग चा प्रयोग केला त्यांच्या ह्या संशोधनात त्यांनी HPC कोन्क्रीत आसे बनविले कि रस्ता वातुकीस लवकर उघडता आला.SCC चा प्रथम उपयोग केला त्यामुळे रस्ते जलद  बनू लागले SCC चा उल्लेख सुधारित  कोड मध्ये केला आहे
२००७ साली प्रथम  इ-मार्ग
प्रथम (HCC ) चा वापर
प्रथम (SCC ) चा वापर  
२०१६  त्या रस्त्यालाअजून एकाही खड्डा नाही


२००३ साली प्रथम  इ -पथ
प्रथम जास्त ताक्ती चा Grout
भारतामध्ये पहिल्यांदा इ -पथ डॉ देशमुखांनी सुरत मध्ये वापरला
डॉ  देशमुख यांनी भारतीय रस्ते क्षेत्रात क्रांती केली असे म्हणावे लागेल

कोणीही व्यक्ती किवा स्वंस्था  डॉ देशमुखांच्या  सल्याने हे रस्ते बनाउ शकतो डॉ  देशमुखांनी रस्त्याच चा कॉस्ट बेनिफिट स्टडी केला आहे त्यात आसे आढळून आले इ-मार्ग पारंपारिक कोन्क्रीत पेक्षा स्वस्त आणि इ-पत पारंपरिक डांबरी रस्त्याच्या किमतीत बनवता येऊ लागले ह्या दोन्ही इ-पथ आणि इ-मार्ग  तंत्रद्यानाचा उपयोग केल्याने सरकाच्या ठराविक किलो मिटर  दिवसाला रस्ते बनवण्याच्या प्रकल्पाला साथ मिळेल
एक किलोमीटर सिंगल लेन रस्त्याला लागणारा खर्च दिला आहे



खर्च
कोन्क्रीत रोड
१,२१,८०,०००
     इ -Marg  
८७,००,०००
     इ-पथ
४५,००,०००
ह्या रस्त्यामुळे मोठ्या प्रमाणात पैशाची बचत होणार आहे
मोठ्या प्रमाणात  कोळश्याच्या राखेचा वापर केल्या मुळे भारताला भेड सावन्याऱ्या ग्लोबल वॉर्मिंग चा प्रश्न थोड्याफार प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे. सिमेंट बनण्यासाठी लागणारे कच्चे इंधनाची सुद्धा बचत होयील


डॉ  देशमुख  मुंबई विद्यापीठाचे चे विद्यार्थी आहेत ते   ACC कंपनीचे रिसर्च/ देव्लोप्मेंत मधून निवृत  झाले त्यांनी  चाळीस वर्ष  रस्त्यासंबंधी संशोधन केले आहे..ते महाविद्यालयात  असताना त्यांनी पंधरा संशोधन papers इंडिअन  आणि international journal मध्ये प्रकाशीत केले आहेत


हे रस्ते महापालिके पुरते र्यादित  राहिले नाही हे रस्ते टाटा उद्योग समूहामध्ये  प्रसिद्ध आहेत टाटा सामूहाच्या चेंबूर येथील टाटा पॉवर फक्टरीमध्ये आणि टाटा कोलोनी खोपोली मध्ये ४५% कोळश्याच्या
राखेचा  वापरुन इ -मार्ग बनवला.
रस्त्याचा  परफॉर्मनन्स ,कॉस्ट, आणि कोळश्याच्या राखेचा मोठ्या प्रमाणात वापर ह्या गोष्टींचाअभ्यास केल्यावर टाटा मानेजमेंटने ठरवले कि सर्व रस्ते इ -पथ  आणि  इ-मार्ग पद्धतीनेच करावयाचे ' 
मानेजमेंटने ठरवले कि Corporate responsibility scheme द्वारा ह्या रस्त्यचा उपयोग सभोवतालच्या गावामध्ये करावयाचा. परिणाम भारत स्वझ्य आणि प्रगत होइल

ह्या रस्त्यामुळे


  1. स्वत किमतीत सुंदर टिकाऊ रस्ते मिळतील
  2. रस्ते जलद बनल्यामुळे सरकाचे दर दिवशी ठराविक किलोमेतर रस्ते बनवण्यचे संकल्प पुरा होण्यास मदत होईल
  3. काच्यामालाची बचत होईल
  4. भारतभर रस्ते बनवण्याचे सरकारचे धोरण पूर्ण होईल
आहेत कि नाही माझे रस्ते मिल्लिओन डोल्लोर किमतीचे

खालील पत्यावर संकर्प साधावा
डॉ देशमुख e mail vilasdes@gmail.com (M )९८२०८४१६६७
४०१२५१२६








e-Cube Consultants चे कार्यकारी अधिकारी श्री सुहास धुरी
आणि त्याचे सहकारी ह्यांनी चालू असताना मोलाची मदत केली आहे.


हा लेख  इ -मार्ग  म्हणजे UTWT  ह्या ठाणे येथील रस्त्याला १० वर्स पुरी होत आहेत त्या आनुसाघाने   1

No comments:

Post a Comment